कोल्हापूर : वसुधा कचरा वेचक संस्थेतर्फे अवनिच्या अनुराधा भोसले यांचा डॉ. मंजूषा पिशवीकर यांच्या हस्ते सत्कार झाला. कराेडपती कार्यक्रमातील भोसले यांच्या सहभागानिमित्त डॉ. अमरसिंह रजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा आयोजित झाला. वनिता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संगीता लाखे यांनी प्रास्ताविक केले. रविराज कांबळे यांनी ओळख करून दिली. यावेळी सविता कांबळे, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरिना बेपारी, बाळाबाई जाधव, हसिना शेख या वसुधा संस्थेच्या सदस्य उपस्थित होत्या.
बालभिकाऱ्यांच्या मुक्ततेसाठी अभियान सुरू
कोल्हापूर : मानवी अधिकार दिनाचे औचित्य साधून अवनि संस्थेने बालभिकाऱ्यांच्या मुक्ततेसाठी जनजागृती अभियान हाती घेतले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याचे उद्घाटन शहर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाले. पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर बालकांचा भीक मागण्यासाठी वापर करू नये , हा दंडनीय गुन्हा आहे, अशी समज दिली जात आहे.
हयातीचे दाखले देण्याचे आवाहन
कोल्हापूर : सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हयातीचे दाखले या महिनाअखेरपर्यंत बॅंकेत जमा करून पेन्शनसाठी होणारा विलंब टाळावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणपतराव बागवडी, पदाधिकारी ए. जी. चौगले, विजय चव्हाण, विनायक मधाळे, नारायण जाधव यांनी केले आहे.
आम आदमी रिक्षा संघटना निवड
कोल्हापूर : आम आदमी पार्टी रिक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी राकेश गायकवाड व संघटकपदी लाला बिरजे यांची निवड झाली. पुणे अध्यक्ष असगर बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडी झाल्या. सचिवपदी बाबूराव बाजारी, खजिनदारपदी महेश घोलपे, सदस्यपदी प्रकाश हर्णे, कृष्णा सूर्यवंशी, जितेंद्र शिंदे, गजानन खोपडे यांची निवड झाली. संघटनेचे मार्गदर्शक म्हणुन आपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई काम पाहणार आहेत.
(फोेटो: १३१२२०२०-कोल-राकेश गायकवाड)