कोल्हापूर : भारत, चीन, पाकिस्तानसोबत झालेल्या १९६२, १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या व निवृत्तिवेतन मिळत नसलेल्या माजी सैनिक, विधवा यांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक व युद्धात सहभागी झाल्याप्रीत्यर्थ प्रदान केलेल्या नमूद पदकाच्या पुराव्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० एप्रिलपर्यंत भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारद्वारा चीन युद्धात सहभागी झालेल्यांना पदक तसेच पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्यांना रक्षा पदक, समर सेवा स्टार हे पदक व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी सैनिकांना संग्राम पदक प्रदान करण्यात आले आहे.
कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यातील बेरोजगार एवं शेती व्यवसायावर अवलंबित तसेच कृषी पर्यटनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक माजी सैनिक, विधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १० एप्रिलपर्यंत फोन किंवा ई-मेलद्वारे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
---
वाहनांचा लिलाव ९ एप्रिल रोजी
कोल्हापूर : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अटकावू न ठेवलेल्या वाहनांचा लिलाव ९ एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली. याबाबतची माहिती www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ६ एप्रिलपासून उपलब्ध होईल.