कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल (मुंबई) यांच्या कार्यालयात २२ जूनला डाक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर अधीक्षक यांनी मंगळवारी दिली.
या डाक अदालतीत महाराष्ट्र आणि गोव्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांत झालेले नाही, अशा तक्रारींची दखल घेतली जाईल. टपाल वस्तू, मनी ऑर्डर बचत बँक खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. नागरिकांनी तक्रार एम. शान्तला भट्ट, सहायक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई ४००००१ यांच्या नावे दोन प्रतीसह १० जूनपर्यंत पाठवावी.
--
रमाई घरकूल योजनेसाठी अर्ज
कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे स्वत:चे पक्के घर नाही त्यांनी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांमार्फत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शहरी भागासाठी नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांकडे हे अर्ज सादर करावेत. सामाजिक न्याय विभागातर्फे या प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकूल योजना तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना (फक्त ग्रामीण) राबवली जाते.
--