कोल्हापूर : कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी दिलीप यशवंत कदम यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथेही कर्तव्य बजावले आहे. कोरोना काळातही त्यांनी उत्तम काम केले.
त्यांचा कोषागार अधिकारी महेश कारंडे, अप्पर कोषागार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी दिलीप कोळी, सुनील शिंदे, चंद्रकांत हांडे, रवींद्र घोरपडे, माणिकलाल विभुते, सुनील वैद्य, भिकाजी पाटील उपस्थित होते.
---
शाहू-आंबेडकर स्मारक व्हावे
कोल्हापूर : शाहुपुरीतील जुन्या पोलीस स्टेशनच्या वास्तूत छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. ही वास्तू पाडण्यात आली असून तेथे नवीन इमारत उभारण्याचा घाट घातला जात आहे, तरी या जागेवर भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने सोमवारी केली. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.
शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या महामानवांचे भव्य स्मारक बनवून येथे ग्रंथालय, अभ्यासिका सुरू करण्यात यावे व हे समतावादी चळवळीचे केंद्र व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, आर. बी. कोसंबी, सुरेश सावर्डेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--