कोल्हापूर : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक १३ सप्टेंबर रोजी होत आहे. यादिवशी सकाळी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर साडेअकरा वाजता सभागृह क्रमांक १, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, पुणे येथे ही बैठक होणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिवांनी दिली.
---
आधारला मोबाइल लिंक करण्याची मोहीम
कोल्हापूर : कोल्हापूर डाक विभागाच्या पोस्टमनच्या माध्यमातून आधारला मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याच्या सुविधेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लोक आग्रहास्तव ६ व ७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा ही मोहीम राबवण्यात येत आहे.
याअंतर्गत मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी सर्व रहिवाशांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस लिंकिंगसाठी तसेच अन्य मोठ्या आस्थापना, कार्यालय प्रमुख देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमनशी संपर्क करू शकतात. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक रूपेश सोनावले यांनी केले आहे.
--