शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

घटक पक्ष म्हणून भाजपने विचार करावा, अन्यथा स्वतंत्र लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:23 AM

बांबवडे : मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा विकास निधी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासाठी आणला असून, आघाडीचा घटक पक्ष म्हणून ...

बांबवडे : मुख्यमंत्री व चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा विकास निधी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासाठी आणला असून, आघाडीचा घटक पक्ष म्हणून भाजपनेच विचार करावा. न केल्यास जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याची घोषणा करून माजी मंत्री विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पिशवी (ता. शाहूवाडी) येथे पिशवी जि. प. मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन व जनसुराज्य-काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी करणसिंह गायकवाड प्रमुख उपस्थित होते.यावेळी विनय कोरे म्हणाले की, व्यवसायातून ठेकेदार व नातेवाइकांचा विकास साधण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. आमदारकीच्या सत्तेचा वापर त्यांनी यासाठीच केला आहे. त्यांनी स्वत:च्या हिमतीवर एक तरी पाझर तलावाचे काम केल्याचे दाखवावे, मी राजकारण सोडून देईन. ते कार्यसम्राट आमदार नसून, उद्घाटन सम्राट असल्याची टीका विनय कोरे यांनी आमदार सत्यजित पाटील यांच्यावर केली.यावेळी करणसिंह गायकवाड म्हणाले की, विद्यमान आमदार लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भूलथापांना कोणी भुलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, बाजार समितीचे सभापती बाबा लाड, माजी उपसभापती महादेव पाटील, समाज कल्याण सभापती इशांत महापुरे, सुभाष इनामदार, दगडू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य अमर खोत, माजी सभापती पंडित नलवडे, एच. आर. जाधव, आदी उपस्थित होते.सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोडया मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच वक्त्यांनी आमदार सत्यजित पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवून त्यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. शिवसेना-भाजप युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असल्याने विनय कोरे यांनी बोलावलेल्या मेळाव्याची उस्तुकता होती.