राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का? अजितदादांनी एका वाक्यात मजेशीर दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:50 PM2024-01-29T19:50:20+5:302024-01-29T19:50:34+5:30
आज कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी घेतली.
Ajit Pawar ( Marathi News ) : कोल्हापूर- आज कोल्हापुरातील कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या सोहळ्यासाठी राज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी अजित पवार यांची अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. देशातील आणि राज्यातील सध्याचे राजकारण तसेच जुन्या काळातील आठवणी अजित पवार यांनी सांगितल्या.
या मुलाखतीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबतही भाष्य केले. अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी अजितदादांना राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का असा प्रश्न केला, यावेळी उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आता आपली एवढी चांगली मुलाखत सुरू आहे, यात तुम्ही का मीठाचा खडा टाकत आहात', असं उत्तर देताच सभागृहात एकच हशा पिकला.
'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती
यावेळी अजित पवार यांनी राजकारणात प्रवेशावेळच्या आठवणींना उजाळा दिला.अजित पवारी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं कौतुक केले. अजितदादा म्हणाले, त्यावेळी जगात मंदीची लाट आली होती तेव्हा भारत देश वाचला ते फक्त मनमोहन सिंह यांच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, असं कौतुक पवार यांनी केले. "आता तसेच नेतृत्व पीएम नरेंद्र मोदी यांच्यात आहे, देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वंदे भारत ट्रेन, हायवे मोठे करण्याच काम , परदेशात भारताच स्थान वेगळ निर्माण झाले आहे, असंही पवार म्हणाले.
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आता आपण एकत्रित आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. जनता जनार्दन जे ठरवेल तेच होतं. सध्या बिहारमध्ये जे घडले आहे, त्यात थोडस वेगळ आहे. आम्हाला असं कळलं की तिथे नितीश कुमार यांच्या पक्षातील आमदार फोडण्याच काम सुरू होते. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावाही अजित पवार यांनी केला.