आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १९ : ‘शोले’ चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील तरुणाने मद्यप्राशन करुन पत्नीसमोर शेंडापार्कमधील जलकुंभावरुन सुमारे १५ ते २० फुटावरुन उडी टाकून जखमी झाल्याची ही घटना सोमवारी सकाळी घडली. संतोष बापू गायकवाड (वय २८) असे या तरुणाचे नांव असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
संतोष गायकवाड हा मद्यप्राशन करुन शेंडापार्कमधील जलकुंभजवळ मद्यप्राशन करुन झोपला होता. त्यावेळी त्याची पत्नी नम्रता ही आली. तिला पाहून तो उठला व थेट जलकुंभावर गेला. तेथून नम्रतासमोर त्याने उडी मारली. यामध्ये पायाला व कंबरेला दुखापत झाली. तिने हा प्रकार सासू मंदा गायकवाड यांना सांगितला. त्यानंतर या दोघींनी संतोषला सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संतोष हा गवंडी काम करत असल्याचे नम्रता गायकवाड यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.