शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

‘बोटावरची शाई दाखवा, सोने-चांदी, दाबेलीवर सवलत मिळवा, कोल्हापुरातील व्यावसायिकांचा पुढाकार

By संदीप आडनाईक | Published: November 20, 2024 5:28 PM

संदीप आडनाईक कोल्हापूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत ...

संदीप आडनाईककोल्हापूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी शहरातील अनेक व्यावसायिक आणि विक्रेते यांनीही पुढाकार घेतला आहे.मतदानासाठी विविध सवलती देणाऱ्या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे सहायक नोडल अधिकारी नीलकंठ करे, वर्षा परीट यांच्या प्रयत्नांतून अनेक व्यावसायिक पुढे येत आहेत. खाद्यपदार्थ, दागिने यांवर २० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाने तर केस कापल्यानंतर सवलत दिली आहे. ‘शाईचे बोट दाखवा आणि सवलत मिळवा’ अशा आशयाचे थेट आवाहन या व्यावसायिकांनी मतदारांना केले आहे.

मतदान केल्यानंतर जो बोटावरची शाई दाखवील त्याला सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. - नंदू बेलवलकर, अध्यक्ष, कोल्हापूर सुवर्ण कारागीर सेवा संस्था.

मतदान केल्याचा पुरावा दाखवल्यास मतदाराला २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दागिन्यांच्या मजुरीवर २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. - नचिकेत भुर्के, अध्यक्ष, सोने-चांदी कारागीर बहूद्देशीय असोसिएशन, कोल्हापूर

मतदान करून येणाऱ्या पहिल्या २०१ मतदारांना १ दाबेली किंवा १ हॉट कॉफी फ्री, त्यानंतर येणाऱ्यांना सर्व ऑर्डरवर २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. - राजेंद्रकुमार सुतार, हरभोले कॅफे, अमरनाथ हाईट, हॉकी स्टेडियम रोड आणि एम्पायर टॉवर, पितळी गणपतीजवळ, ताराबाई पार्क.

बोटावरची शाई दाखवतील अशा सर्व मतदारांना सर्व सेवांवर २० टक्के सवलत देण्यात येईल. - सयाजी झुंजार, सयाजी हेअर ॲंड ब्युटी कन्सेप्टस, दाभोळकर कॉर्नर.

मतदारांना २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत हेअर ॲंड ब्युटीसंदर्भातील सर्व सेवांच्या मजुरीवर २० टक्के सवलत दिली जाईल. - अतुल टिपुगडे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024