यड्राव : शिक्षण संस्थेमधील अचूक नियोजन, पालकांचा दृढ विश्वास आणि विद्यार्थ्यांची जिद्द या त्रिसूत्रीवर श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची यशस्वी घोडदौड अविरत सुरू आहे. या त्रिसूत्रीमुळेच जेईई मेन परीक्षेत विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असल्याचे गौरवोद्गार श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे अध्यक्ष ए. आर. तांबे यांनी केले.
देशातील सर्व आयआयटीमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन) २०२१ परीक्षेत श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. त्या यशवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून तांबे बोलत होते.
जेईई परीक्षेमध्ये यशस्वी श्रद्धा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, कंसात अखिल भारतीय पात्रता क्रमांक - हरीश मोकाशी (३०७), तेजस भोसले (४२५), राजवर्धन पाटील (१५८८), अभिकुमार गुप्ता (२११३), आकाश देवमोरे (२२९०), मयूरेश नरेवाडीकर (२४७१), साहिल पवार (२५४६), राहुल पाटील (४१५९), समीक्षा यादव (४१७५), अमन सय्यद (४४४०). यानुसार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून जेईई परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. संस्थाध्यक्ष ए. आर. तांबे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष ए. आर. तांबे, एम. एस. पाटील, एस. वाय. कौंदाडे, एस. एस. पवार, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, आदींचे मार्गदर्शन लाभले.