जानेवारी २०२० मध्ये स्वामीजींचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व त्यांचे उत्तराधिकारी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला. बेळगाव जिल्ह्यातील मस्ती व हंचिनाळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे मठाची शाखा व जमिनी आहेत. नूलच्या मठात ज्ञानोपदेश, धर्माेपदेश, अन्नदान, अनुष्ठान, दीक्षा व धार्मिक शिक्षण आदी बाबी त्यांनी अखंडपणे सुरू ठेवल्या होत्या. नूल येथे कल्याण मंडप आणि गडहिंग्लज येथे भव्य मंगल कार्यालय उभारण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिली. त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याचा वसा नवे मठाधिपती श्री. मंजुनाथ देवरू नक्कीच पुढे चालवतील, यात संदेह नाही.
----------
नूलचे भूषण आणि आधारवड..!
पाणी टंचाईमुळे नूल मठाच्या आवारातील दोन कुपनलिका त्यांनी गावासाठी खुल्या केल्या आहेत. गावातील श्री लक्ष्मी पतसंस्थेची स्थापना, न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे बांधकाम, ग्रामदैवत हनुमान मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, रामपूरवाडीतील सिद्धेश्वर मठ व सुरगीश्वर मठाच्या जीर्णोद्धारात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून जंगम समाजातील मुलांसाठी शालेय आणि वैद्यकीय शिक्षणाची सोय त्यांनी मठात केली आहे.
----------------------
श्री महास्वामीजींच्या जीवनातील ठळक नोंदी
६ एप्रिल १९३८ : कणगला (ता. हुक्केरी) येथील हिरेमठ घराण्यात महास्वामीजींचा जन्म.
ऑगस्ट १९५४ : श्री. सुरगीश्वर मठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड
१९ डिसेंबर १९७७ : श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे अकरावे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक.
११ मार्च १९९९ : नूल ग्रामस्थ आणि भक्तांकडून श्री. महास्वामीजींची एकसष्टी.
२९ जानेवारी २०२० : श्री चंद्रशेखर महास्वामीजींचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आणि मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून श्री. मंजुनाथ देवरू यांचा पट्टाभिषेक.
२७ ऑगस्ट २०२१ : महास्वामीजींचे महानिर्वाण.
----------------------
फोटो ओळी : १ हजार वर्षांची परंपरा असलेला का.नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन श्री सुरगीश्वर मठ.
क्रमांक : १२०९२०२१-गड-०५
लिंगैक्य श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी.
क्रमांक : १२०९२०२१-गड-०६
लिंगैक्य श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची समाधी (गदगी)
क्रमांक : १२०९२०२१-गड-०७