शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

अंबाबाई मंदिरात श्रीपूजक ठाणेकर आल्याने पुन्हा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 5:37 PM

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना मंदिरात बंदी केली असताना त्यांना मंदिरात पोलीस संरक्षण दिल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी श्रीपूजक हटाव संघर्ष कृती समितीच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुमारे तासभर ठिय्या आंदोलन करून निदर्शने केली.

ठळक मुद्देआंदोलक महिलांकडून धक्काबुक्कीचा प्रयत्नश्रीपूजक हटाव संघर्ष समितीचा कायदा हातात घेण्याचा इशारापोलीस ठाण्यासमोर तासभर ठिय्या आंदोलन करून निदर्शने पोलीस अधीक्षकांसोबत होणार बैठकअंबाबाई मंदिरातच तणावाचे वातावरणआंदोलकांपेक्षा सशस्त्र फौजफाटा मोठा!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांना मंदिरात बंदी केली असताना त्यांना मंदिरात पोलीस संरक्षण दिल्याच्या निषेधार्थ रविवारी सकाळी श्रीपूजक हटाव संघर्ष कृती समितीच्यावतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुमारे तासभर ठिय्या आंदोलन करून निदर्शने केली.ठाणेकर पिता-पुत्रावर तातडीने कारवाई न केल्यास आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. याबाबत आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता आंदोलकांची पोलीस अधीक्षकांसोबत पोलीस मुख्यालयात बैठक आयोजित केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलकांना दिली.दरम्यान, श्रीपूजक बाबूराव ठाणेकर हे मंदिरात आल्याची माहिती मिळताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अंबाबाई मंदिरात धाव घेऊन ठाणेकर यांना बाहेर हाकलण्याची मागणी केली. त्यावेळी मंदिरातच तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला घोषणा, निदर्शने करत असतानाच गोंधळाच्या वातावरणात साध्या गणवेशातील पोलिसांनी श्रीपूजक ठाणेकर यांना सुरक्षा कडे करून त्यांना मंदिराच्या गाभाºयातून बाहेर काढले. यावेळी काही महिलांनी पुढे होऊन ठाणेकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी ठाणेकर यांना सुरक्षितपणे मंदिराबाहेर काढून महाद्वाररोड मार्गे त्यांना घरी सोडले.आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर वरिष्ठ अधिकाºयांसह मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अश्रुधुराच्या नळकांड्यासह शंभरहून अधिक साध्या गणेवशातील पोलिसांनी आंदोलकांना गराडा घातला होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह अंबाबाई मंदिर परिसरात मोठा सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या वातावरणामुळे मंदिर परिसरात आलेले भाविक भांबावले होते.महात्मा आहेत का ते?ठाणेकर पितापुत्रांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने २४ तास दोन स्टेनगनधारी पोलीस कर्मचारी पुरविले आहेत. ते दोघे पितापुत्र महात्मा की अन्य व्हीआयपी आहेत? या स्टेनगनधारी पोलीस कर्मचाºयांपुढे त्या पितापुत्रांना मारहाण केली जाऊ शकते. मात्र, आम्ही कायदा पाळणारे आहोत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी. तसे न झाल्याने जनक्षोभ झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी दिला.कायदा इथे सर्वांना सारखा का नाही?साताºयात छत्रपती उदयनराजे यांना अटक केली जाऊ शकते, तर कोल्हापुरात अजित ठाणेकर हे कोण आहेत? विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणतात, कायदा सर्वांना सारखा आहे. मग कोल्हापुरात तो वेगळा आहे का? असा सवाल माजी आमदार सुरेश साळोखे यांनी विचारला. या वादावर योग्य निर्णय देऊन नजीकच गणेशोत्सव असल्याने तो त्वरित मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.बाहेर का काढायचे?अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला दर्शन घेत असताना वादग्रस्त श्रीपूजक बाबूराव ठाणेकर हे त्यांना गाभाºयात दिसले. त्यानंतर त्यांनी ठाणेकर यांना बाहेर काढण्याची मागणी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाºयांकडे केली. काही वेळाने तेथे आलेले सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी ‘त्यांना बाहेर का काढायचे?’ असा सवाल करीत महिलांशी हुज्जत घातली.

आदेशाचे पालन करा

राजर्षी शाहू महाराजांनी १९१४ साली अंबाबाई मंदिरातील पुजाºयांसंबंधी वटहुकूम काढला होता. त्यावेळी त्यात पाचजणांची नियुक्ती केली होती. त्यात अंबाबाई देवीला वाहलेली किमती वस्तू संस्थान अर्थात सरकारची असेल, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यातून जमणारा महसूल हा संस्थानाच्या खजिन्यात जमा होईल. त्यात ठाणेकर, मुनीश्वर यांचा उल्लेखही नाही. देवीच्या नावावर पुजाºयांनी जमविलेली संपत्ती बेहिशेबी आहे. आयकर, इडी, आदी खात्यांनी या पुजाºयांकडे चौकशी करावी. मंदिर परिसरातील अनेक फ्लॅटचे मालक हे पुजाºयांचेच नातेवाईक आहेत. या पुजाºयांवर सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी डॉ. सुभाष देसाई यांनी केली.

आंदोलनात सहभागी मंडळी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर, तानाजी पाटील, दिलीप देसाई, चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, सुजित चव्हाण, शशी बिडकर, रवी चौगुले, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, मराठा सेवा संघाचे चंद्रकांत पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, बाबा पार्टे, विनायक साळोखे, नागेश घोरपडे, दिलीप माने, सुरेश गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, डॉ. जयश्री चव्हाण, सुधा सरनाईक, सुमन चव्हाण, स्मिता हराळे, लता जगताप, सुशीला लाड, आदी उपस्थित होत्या.

आंदोलकांपेक्षा सशस्त्र फौजफाटा मोठा!

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर श्रीपूजक हटाओ संघर्ष समितीतर्फे रविवारी सकाळी झालेल्या ठिय्या आंदोलनावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. यात अश्रुधुराच्या नळकांडीसह सुमारे शंभरभर पोलीस साध्या व गणवेशात तैनात करण्यात आले होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्यास आंदोलकांऐवजी पोलिसांचाच गराडा अधिक होता. यात शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, तानाजी सावंत, प्रवीण चौगुले, संजय साळुंखे, ‘एलआयबी’चे पोलीस निरीक्षक पाटोळे यांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासह नायब तहसीलदार, करवीर तलाठी हेही उपस्थित होते.श्रीपूजक बाबूराव ठाणेकर पुन्हा मंदिरात

अंबाबाई देवीला घागरा-चोली नेसविल्याप्रकरणी श्रीपूजक अजित ठाणेकर व त्यांचे वडील बाबूराव ठाणेकर यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊनही अटक केली जात नाही, याबद्दल जाब विचारण्यासाठी रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन सुरू होते. त्या दरम्यान दुपारी १२.४० मिनिटांनी श्रीपूजक बाबूराव ठाणेकर पुन्हा तिसºया दिवशीही मंदिरातील गाभाºयात उपस्थित राहिले, ही बाब आंदोलकांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

ठिय्या आंदोलन संपल्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, डॉ. जयश्री चव्हाण, सुधा सरनाईक, सुमन चव्हाण, स्मिता हराळे, लता जगताप, सुशीला लाड, आदी महिलांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यात देवीच्या गाभाºयात बाबूराव ठाणेकर तेथे सोवळे नेसून उपस्थित होते. त्यामुळे या महिलांनी त्यांना गाभाºयातून बाहेर काढण्याची मागणी बंदोबस्तावरील पोलिसांकडे केली. त्यांना बाहेर काढण्यावरून वादाला तोंड फुटले. त्यात अखेर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी व पोलिसांनी सुरक्षा कडे करीत ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढत घरी सुखरुप पोहोचविले. या दरम्यान त्यांना धक्काबुक्कीचा व जाब विचारण्याचा प्रयत्न झाला. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मंदिरात दिसल्यास कायदा हातात घेऊ व जिजाऊ स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे सुनावले.कानपिचक्या

जिजाऊ महिला ब्रिगेडच्या महिलांनी मंदिरात जाऊन श्रीपूजक बाबूराव ठाणेकर यांना तेथून बाहेर काढण्याचे अचानक आंदोलन केले. त्यामुळे चिडलेल्या संघर्ष समितीचे नेते संजय पवार, आर. के. पोवार यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. आंदोलनास गालबोट लागू नये याची काळजी घ्या, असे सुनावले. त्यावर ‘आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेल्याचे’ सांगण्याचा प्रयत्न महिला कार्यकर्त्यांनी केला.