बाबासो हळिज्वाळेकोगनोळी -कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले आडी येथील श्री दत्त मंदिर ४ फेब्रुवारी २०२१ पासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सध्याच्या काळात कोरोना महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण आलेले असल्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चार पर्यंत मंदिर उघडे राहील. भाविकांनी दर्शनासाठी येताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे.ज्यांच्या परिसरात किंवा घरात कोरोनाचे रुग्ण असतील त्यांनी मंदिरात येणे टाळावे. कोरोना संकटकाळात आरंभापासूनच लोकांचे विविध प्रश्न, अनेक अडीअडचणी किंवा इतर काही मुद्द्यांविषयी व्हाट्स ॲपद्वारे मार्गदर्शन करणे चालूच आहे. त्यासाठी व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असे दत्त देवस्थान समितीमार्फत आवाहन करण्यात आले आहे.