श्री राम जन्मकाळ सोहळ्यानिमित्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व पूजा झाल्यावर सकाळी अकरा वाजता राम मंदिरासमोर येथील दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण झाले. बारा वाजता ‘प्रभू रामचंद्र की जय’च्या घोषात जन्मकाळ सोहळा झाला. अबीर, गुलाल व फुलांची राम मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या व आकर्षक फुलांनी सुशोभित केलेल्या चांदीच्या पाळण्यावर उधळण केली. यानंतर धूप, दीप, आरती करण्यात आली. श्री रामचंद्रांच्या पाळण्याची पूजा व आरती करून पाळणा जोजविला. रामचंद्र व सीतामाईच्या मूर्तीला ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात उत्तम पुट्टोपुजारी यांनी विधिवत महापूजा केली. नंतर सुंठवडा प्रसादाचे वाटप करणेत आले.
फोटो - २१०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात राम मंदिरात रामनवमी मर्यादित पुजारी यांच्या उपस्थितीत साजरी झाली. (छाया-प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी)