कोल्हापूर : येथील सारस ट्रेडर्स, एस . एस प्राॅड्क्टचे प्रथितयश उद्योजक श्रीपाद कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,सून ,मुलगी व भावंडे असा मोठा परिवार आहे.
धंद्याचे कोणतेही बाळकडू नसताना ही १९८१ च्या बॅचचे एमबीए असलेल्या श्रीपाद कुलकर्णी यांनी पहिल्यापासून व्यवसायच केला आणि यशस्वी केला. साबण बनवणे आणि विकणे यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य रिटेल इलेक्ट्राॅनिक दुकान असलेल्या सारस इलेक्ट्रॉनिक्स या दुकानापर्यंत येऊन थांबला. प्रचंड मोठा मित्रपरिवार असलेले कुलकर्णी यांची चांगला मालक अशी देखील ओळख होती.
त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. ते होलसेल व्यापारामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तीन हजारापेक्षा जास्त व छोटे मोठे व्यापाऱ्यांशी संलग्न होते.
(फोटो: २५०५२०२१-कोल-श्रीपाद कुलकर्णी निधन)