शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शिरोळमधून मुंबईला एसटी धावणार कधी?

By admin | Published: January 08, 2016 12:11 AM

खासगी वाहनांना प्राधान्य : कुरुंदवाड आगारातून मुंबईला एकही बस नाही

संतोष बामणे -- जयसिंगपूर--शिरोळ तालुक्यातून एकही एसटी बस मुंबईकडे जाणारी नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे तालुक्याकडे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. राजधानीच्या ठिकाणी जाण्यासाठी एकही एसटी नसल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य देऊन येथील प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे राजधानीला जाण्यासाठी कायमस्वरूपी तालुक्यातून एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे.शिरोळ तालुक्यात प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कुरुंदवाड येथे एस. टी. आगार आहे. तालुक्यातील ५३ गावे व दोन शहरे या आगारावर अवलंबून आहेत. जयसिंगपुरातून रेल्वे सेवा असली, तरी एसटीलाही तितकेच महत्त्व आहे. तालुक्यात जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मोठे शहर असून, जयसिंगपुरातून दररोज १६०० हून अधिक बसेस ये-जा करतात. सध्या शिरोळ तालुक्यातून कुरुंदवाड-पुणे एसटी बसेसच्या दररोज सात फेऱ्या होतात. यापासून कुरुंदवाड आगाराला चांगले उत्पन्न मिळते.कुरुंदवाड आगाराकडून मुंबई येथे जाण्यासाठी तालुक्यातून एकही एसटी बस नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांतून अगदी खेडेगावातूनही मुंबई, कल्याण, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, दादर, आदी ठिकाणांवर गाड्या दररोज सोडण्यात येतात. मात्र, तालुक्यात प्रवासी असतानादेखील रेल्वेच्या भरवशावर राहून मुंबईकडे जाणारी एकही एसटी कुरुंदवाड आगाराकडून सोडली जात नाही.जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन असून प्रवासी रेल्वेनेही प्रवास करतात. मात्र, कोल्हापूरहून रेल्वे फुल्ल आरक्षित होऊन येत असल्याने जयसिंगपूरमध्ये आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना ‘वेटिंग’वर अवलंबून राहून किंवा जनरल गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर खासगी बसमधून प्रवास करण्यासाठी एसटीच्या तुलनेत दुप्पट दर द्यावा लागत आहे.जयसिंगपुरातून दररोज ३० हून अधिक खासगी बसेस मुंबईकडे धावतात. मात्र, सामान्य नागरिकांना त्यांचा दर परवडणारा नसतो. जादा दर देऊन खासगी बसने प्रवास करावा, नाही तर रेल्वेतून धक्केखात प्रवास करावा लागत आहे किंवा सांगली, मिरज येथील एसटी बसस्थानकातून मुंबईला बस पकडावी लागते. कुरुंदवाड आगाराकडून सकाळच्या सुमारास दोन, सायंकाळी दोन, रात्री दोन अशा बसेस ग्रामीण भागातून, दत्तवाड, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर, मुंबई अशाप्रकारे बसेचची मागणी प्रवासीवर्गांतून होत आहे. ही बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ तसेच पैशांची बचत होऊन कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. (क्रमश:)शिरोळ तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, तालुक्यातील प्रवाशांना सांगली, मिरज, इचलकरंजी येथे जाऊन मुंबईसाठी बस पकडावी लागते, अन्यथा रेल्वेचे वेटिंग आणि खासगी बसच्या जास्त दराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातून थेट मुंबईला गाडी सोडल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. - नितीन बागे, सामाजिक कार्यकर्ते, जयसिंगपूर.तालुक्यातून सध्या कुरुंदवाड-पुणे या गाडीच्या सात फेऱ्या असून, मुंबईला फक्तसुटीच्या हंगामात कुरुंदवाड-बोरिवली एक गाडी सोडली जाते. प्रवाशांची मागणी असल्यास आगाराकडून दररोज गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल. मध्यंतरी सांगली आगाराकडून कुरुंदवाड आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या. त्यामुळे आगाराला अडचणी निर्माण होत आहेत. - एम. बी. भंडारे, कुरुंदवाड आगारप्रमुख.