शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पणनमंत्र्यांकडून शिरापूरकर धारेवर

By admin | Published: January 05, 2015 12:25 AM

लवाद नेमणूक प्रकरण : दबावाने तारीख पे तारीख

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील झालेल्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी लवाद नेमणुकीस टाळाटाळ करणारे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धारेवर धरले. राजकीय दबावापोटी गेले वर्षभर त्यांनी केवळ तारखा देण्यापलीकडे काहीच केले नसल्याने बाजार समिती वर्तुळातून टीकेची झोड उठवली जात आहे. बाजार समितीच्या संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे समितीवर प्रशासक आले. समितीच्या १९८७ पासूनच्या संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी शहर उपनिबंधक रंजन लाखे यांनी केली. यामध्ये अनेक गंभीर ठपके ठेवले आहेत. चौकशीचा अहवाल देऊन दीड वर्षे झाले. त्यानंतर १९८७ पासूनच्या सर्व संचालकांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून म्हणणे घेऊन वर्ष उलटले आहे. तरीही गेले वर्षभर लवाद नेमणुकीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक करत आहेत. तोपर्यंत मध्यंतरी पणन संचालकांनी फेरचौकशीचे आदेश दिले. त्यानुसार फेरचौकशी होऊन तो अहवालही जिल्हा उपनिबंधकांकडे सादर झाला आहे. तरीही लवाद नेमणुकीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत बाजार समितीमधील काही घटकांनी थेट पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मंत्री पाटील यांनी लवाद नेमणुकीस विलंब केल्याबद्दल शिरापूरकर यांना शनिवारी चांगलेच धारेवर धरले. तातडीने लवादाची नेमणूक करून दोषी संचालकांकडून बाजार समितीचे झालेले नुकसान वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पणनमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तरी जिल्हा उपनिबंधक लवादाची नेमणूक करणार का? की पुन्हा तारीख पे तारीखच देणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनुकंपावरील मुले सहा महिने लोंबकळत!बाजार समितीमध्ये अनुकंपावर घेतलेल्या सात मुलांना नियमित केल्याचा प्रस्ताव समितीचे तत्कालीन प्रशासक डॉ. महेश कदम यांनी सहा महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे दिला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर व नियमित आहे. तरीही या मुलांना सहा महिने जाणीवपूर्वक लोंबकळत ठेवल्याच्या तक्रारी समिती वर्तुळात येत आहेत.