कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्याचे दागिने उत्पादनावर लावलेल्या एक टक्का अबकारी कराला विरोध करण्यासाठी ‘बंद’मध्ये सराफ व्यावसायिक सहभागी झाल्याने गुरुवारी दुसऱ्या दिवशाही सराफ बाजारात शुकशुकाट होता. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर आता परिणाम होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना यासंबंधी आॅनलाईन निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.केंद्रीय अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी ‘आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशन’ या शिखर संघटनेच्या आदेशाने जिल्ह्यातील सराफ बाजार बुधवारपासून तीन दिवस बंद आहेत. गुरुवारी बंदचा दुसरा दिवस असल्यामुळे पूर्ण सराफ बाजारात शुकशुकाट होता. या सराफ बाजारावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर हळूहळू परिणाम होत आहे. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक व खासदार राजू शेट्टी यांना निवेदन देण्यासाठी सराफ संघाच्या कार्यालयात सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. दोन्हीही खासदार बाहेरगावी असल्यामुळे त्यांची थेट भेट घेता आली नाही. अबकारी करामुळे सराफ व्यवसायावर कसा दूरगामी परिणार होणार आहे, याबाबचे निवेदन या दोन्हीही खासदारांना ‘व्हॉटस् अॅप’वर दिले. त्या अगोदर त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी शहर अध्यक्ष सुरेश गायकवाड, कुलदीप गायकवाड, माणिक जैन, विजयकुमार भोसले, राजेश राठोड, सुरेश ओसवाल, बाबा महाडिक, सुभाष पोतदार, संपत पाटील, संजय पाटील, महेश झोके, गजानन बिल्ले, सुदर्शन पोतदार, कुमार दळवी, आदी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी सराफांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, जिल्हाध्यक्ष अमोल ढणाल, केरबा खापणे, पांडुरंग कुंभार, सचिन देवरुखकर, अविनाश मुखरे, जतिन पोतदार, किरण माणगावकर, विवेक पोतदार, सुरेश जगताप, रणजित मराठे, प्रमोद खांडके, अनिल पाटील, सुधीर पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हुपरीत उद्या राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करणारखासदार राजू शेट्टी हे सध्या दिल्लीत आहेत. आज, शुक्रवारी रात्री ते कोल्हापुरात पोहोचणार आहेत. उद्या, शनिवारी सकाळी हुपरी येथे जिल्हा सराफ संघाचे महेश जोके, राजू घोरपडे, संजय पाटील, आदी पदाधिकारी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंदबाबत चर्चा करणार आहेत.इतर संघटनांचा पाठिंबाकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, चांदी माल उत्पादक सहकारी संघ हुपरीचे अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, जिल्हा सुवर्ण कारागीर संघटना, दैवज्ञ बोर्डिंग संस्थेचे सुधाकर पेडणेकर, पांचाळ सोनार समाजाचे अध्यक्ष अण्णा पोतदार, कोल्हापूर चांदी कारखानदार असोसिएशनचे बाबासाहेब काशीद, झारी संघटना व कालिका ब्रिगेड युवा सोनार संघटनेने बंदला पाठिंबा दिला आहे.
सराफ बाजारात शुकशुकाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2016 12:39 AM