विकेंड लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामुळे आजरा शहरातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता. सर्व प्रकारची दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद होती. संभाजी चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र नागरिकांची किरकोळ वर्दळ सुरुच होती. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.
विकेंड लाॅकडाऊनच्या काळात रस्त्यावर कोणीही येऊ नये यासाठी पोलिसांची गाडी दुपारपर्यंत शहरातील मुख्य रस्ते व चौकातून फिरत होती. तर संभाजी चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपंचायतीकडून दंडात्मक कारवाई सुरु होती. शहरातील फक्त मेडिकल दुकाने व दवाखाने सुरु होते. एसटी सेवाही दोन दिवसांसाठी थांबविली असल्याने बसस्थानकावर कोणी फिरकलेच नाही. भाजीमंडई सह बाजारपेठेत दिवसभर शांतता होती. नेहमी गजबजलेला आजरा आंबोली मार्गावरही पर्यटकांची वाहने किरकोळ दिसत होती.
फोटो कॅप्शन - विकेंड लाॅकडाऊनच्या कडक निर्बंधांमुळे आजऱ्यातील संभाजी चौकात असलेला शुकशुकाट.