फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू ०५) : कोल्हापुरात सोमवारपासून व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत दुकाने सुरू केली. लक्ष्मी रोडवरील कपड्यांची दुकाने उघडून साफसफाई करण्यात येत होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू ०६) : कोल्हापुरात सोमवारपासून व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत दुकाने सुरू केली. महाव्दार रोडवरील कपड्यांची दुकाने उघडून साफसफाई करण्यात येत होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू ०७) : कोल्हापुरात सोमवारपासून व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत दुकाने सुरू केली. व्यापारी संघटनांच्या आवाहनानंतर महाव्दार रोड येथील अनेक दुकानांची शटर उघडण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू ०८) : कोल्हापुरात सोमवारी व्यापारी-व्यावसायिकांच्या संघटनांनी दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले, तर शासन नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याच्या तयारीत महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी होते. त्यामुळे महाव्दार रोड येथील व्यापारी, व्यावसायिक दुकानाच्या दारात थांबून होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू ०९) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू करण्याच्या मुद्द्यावरून महाव्दार रोड येथे व्यापारी-व्यावसायिक आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आमने-सामने आले. त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, आदींनी व्यापारी, व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२८०६२०२१-कोल-दुकाने सुरू १०) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू करण्याच्या मुद्द्यावरून महाव्दार रोड येथे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक झाली. (छाया : आदित्य वेल्हाळ)