दीपक मेटीलसडोली/खालसा : नंदवाळ (ता. करवीर) येथील डोंगर परिसरातील नागटेक या ठिकाणी बिबटयासदृश्य प्राण्याचे सकाळी दर्शन झाले. यामुळे नंदवाळसह वाशी, जैताळ परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.शेतकरी बाजीराव शिंदे हे सकाळी आपल्या शेताकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेताच्या बांधावर बिबटयासदृश्य प्राणी बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच ग्रामप्रशासनाला दिली. ग्रामप्रशासनाने नंदवाळसह शेजारील कांडगाव, जैताळ, देवाळे गावातील शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.अफवेमुळे संभ्रमदरम्यान गावात वाघ आल्याची अफवा सोशल मीडियावरुन पसरल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तरी सदर प्राणी नेमका कोणता आहे हे खात्रीलायक समजल्याशिवाय लोकांनी अशी माहिती प्रसारित करु नये असे आवाहन नंदवाळ ग्रामप्रशासनाने केले आहे.
कोल्हापूर: नंदवाळ परिसरात बिबट्याचे दर्शन? नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:36 PM