कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत रस्त्यावरील वाहतुकीला निर्बध घातल्याने रस्ते रिकामे राहीले, परिणामी, गेले दोन महिने चौका-चौकातील सिग्नल बंदच राहीले होते. पावसाळी वातावरणाचा परिणाम सिग्नलवर होऊन ऐनवेळी ते सुरु करताना अडचणी येऊ नयेत यासाठी सोमवारी सकाळी शहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर चौक, दाभोळकर चौक, ताराराणी चौक असे चार सिग्नल दोन तासाकरीता सुरु करुन चाचणी घेतली. अचानक सिग्नल सुरु झाल्याने शहरात वाहतकीची मोठी कोंडी निर्माण झाली.कोरोना सुरु झाला, अन जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फिरण्यासाठी निर्बध आणले. एप्रीलमध्ये लॉकडाऊन केला. परिणामी रस्ते सुनसान बनले. अत्यावश्यक सेवेतील वाहनाव्यतीरिक्त रस्ते रिकामेच होते. शहरातील एकूण ३५ सिग्नल बंदच राहीले. दोन महिन्यानंतर सोमवारपासून अनलॉक सुरु झाले.
सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यत निर्बध शिथील केले. पहिल्याच दिवशी वाहने रस्त्यावर उतरले. ऊन, पाऊस वातावरण व दोन महिने बंद राहील्यामुळे सिग्नलवर परिणाम होऊन ऐनवेळी सुरु करण्यात अडचणी येतील. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत शहरातील प्रमुख चौक व वर्दळीची ठिकाणचे चारही चौकातील सिग्नल सुरु झाले. अन् वाहनधारक गोंधळले. सर्वच सिग्नल सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली.