राहुल मांगूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनवाड : केंद्रीय जल आयोगाने शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे पर्जन्यमापक यंत्र बसविल्याने गावाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. सदरच्या पर्जन्यमापकामुळे अर्जुनवाडसह परिसरात किती मिलीमीटर पाऊस झाला,याची माहिती उपग्रहाव्दारे या खात्याच्या वरिष्ठ कार्यालय पुणे, दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणी समजणार आहे.येथे १९६९ पासून केंद्रीय जल आयोगाचे केंद्र आहे. या केंद्राचे दत्ताजीराव कदम हायस्कूलच्या प्रांगणात पर्जन्यमापक बसविण्यासाठी नुकतीच मान्यता मिळाली होती. येथील ठेकेदार दीपक पाटील यांनी काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पर्जन्यमापक त्वरीत बसविण्यात आले आहे. या खात्याचे महाराष्ट्रात महाबळेश्वर व अर्जुनवाड या दोनच ठिकाणी
पर्जन्यमापक बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अर्जुनवाड गावाला ही बाब भूषणावह ठरली आहे.येथील केंद्रीय जल आयोगाच्या केंद्राकडे पावसाळ्यात चोवीस तास पाणीपातळी चढ-उताराची नोंद घेतली जाते. पावसाळ्यात प्रतिदिन पाण्याची खोली, गती, नदीची रूंदी याची मोजमाप केली जाते. शिवाय पाण्याची तपासणीही करण्यात येते. तसेच हवेची गती, दिशा तापमानाची कमाल व किमान याची नोंद घेतली जाते. हवेतील आर्द्रताही तपासली जाते. सदरचे केंद्र हे महत्त्वाचे समजले जाते.
पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी जागा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल यादव यांनी येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल येथे करून दिली आहे. तर नुकतीच कार्यालयीन इमारतीसाठी जागाही ग्रामपंचायतीने मंजूर केली आहे. यासाठी कनिष्ठ अभियंता प्रदीपकुमार व उद्धव मगदूम यांचे विशेष सहकार्य व प्रयत्न लाभले आहे.केंद्र गावच्या हद्दीतसन २००५ च्या महापुरात या केंद्राच्या बोटीने गावातील किमान पाचशे नागरिकांना सुरक्षितस्थळी महापुरातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावच्या हिताचे केंद्र बनले आहे.