कोल्हापूर : सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक-कर्ण बधिरांनी निदर्शेने केली. सांकेतिक भाषाचा वापर करत त्यांनी केलेली मागणी लक्षवेधी ठरली.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मूक कर्णबधिर असोसिएशनच्यावतीने बुधवारी सांकेतिक भाषा दुभाषिकेला भारतीय भारतीय संसद भाषेला अधिकृत भाषा देण्याच्या या प्रमुख मागणीसाठी मुक कर्ण बधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शेने करण्यात आली. मागण्याचे निवदेन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, प्रधान मंत्री कार्यालयाने २८ फेबु्रवारी रोजी सांकेतिक भाषेला संविधानच्या आठवी अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रसोबत विधान परिषदेचे सदस्य हरिभाऊ राठोड यांनीही याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.
यावेळी उद्धव पन्हाळकर, अतुल पुणसाळकर, अमेय गवळी, अतुल भाळवणे, गौरव शेलार, अमोल कवाळे, संतोष मिठारी, तेजस मुरगुडे, धीरज कांबळे, प्रियाका महामुनी, जयश्री गवळी उपस्थित होते.