शिरोळ : भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष तरतूदीच्या विरोधात लागू करण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायदा रद्द करावा या मागणीसाठी शिरोळ तालुका बहुजन समाजाच्यावतीने गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.कोणत्याही परिस्थितील हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आली.शिरोळ येथील शिवाजी चौकातून सकाळी मूक मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.एनआरसी व सीएए कायदा झालाच पाहिजे अशा भावना नेतेमंडळींनी मनोगतातून व्यक्त केल्या.
मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील,नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युनुस डांगे,बाळासो शेख,डॉ.अतिक पटेल,दिलीपराव पाटील, कादर मलबारी,फारुक पठाण,सईद पटेल,चंगेजखान पठाण,अब्बास नदाफ ,जयराम पाटील,अस्लम फरास, इकबाल मेस्त्री,सर्फराज जमादार,अफसर पटेल,शकील गैबान यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठया संख्येने सहभागी झाला होता.
मोर्चावतीने तहसिलदार अर्चना मोरे यांना निवेदन देण्यात आले.