कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी नांदेड येथे मूक आंदोलन केले. त्याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या निषेधार्ह वक्तव्याचा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी निषेध करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाज बांधव, कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली. त्यात मराठा समाजातील विविध संघटना, नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांचा प्रतीकात्मक पुतळा ठेवून निषेध नोंदविण्यात आला. काळ्या फिती लावून आणि मास्क बांधून मूक आंदोलन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत हे आंदोलन केले असल्याची माहिती सकल मराठा शौर्यपीठाचे निमंत्रक प्रसाद जाधव यांनी दिली. या आंदोलनात बाळ घाटगे (मराठा समाज संघटक), चंद्रकांत पाटील (मराठा समाज सेवा संघटना), राजू सावंत (छावा युवा संघटना), सुनीता पाटील (राजमाता जिजाऊ ब्रिगेड), बाबा महाडिक (लोकसेवा राजर्षी शाहू प्रतिष्ठान), रूपेश पाटील (संभाजी ब्रिगेड), भाऊ घोडके, चंद्रकांत सूर्यवंशी, रमेश मोरे, दिगंबर फराकटे, उदय घोरपडे, वसंत लिंगनूरकर, संदीप चौगुले, गणेश शिंदे, सुधा सरनाईक, गीता हसूरकर, उमेश पोर्लेकर, श्रीधर गाडगीळ, विनायक फाळके, संजय पोवार, धनंजय सावंत आदी सहभागी झाले होते.
फोटो (२४०८२०२१-कोल-सकल मराठा समाजाचे आंदोलन) : कोल्हापुरात मंगळवारी छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)