निवेदनात म्हटले आहे, चांदी उद्योगामध्ये हुपरी व परिसरामध्ये काम करणाऱ्या कारागीर व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगावर सुमारे ५ हजार कारागीर व २५ हजार कामगार अवलंबून आहेत. एप्रिलपासून राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने चांदी हस्तकला उद्योग पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने व्यवसायासाठी आवश्यक असणारी चांदी बाहेरील बाजारपेठेतून येत नाही व तयार केलेले दागिनेही बाजारपेठेत जात नाहीत. परिणामी चांदी उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संस्थेबरोबरच कामगार विभाग व मदत पुनर्वसन विभाग यांच्याकडून माहिती घेऊन चांदी उद्योगातील सर्व प्रकारच्या असंघटित कारागीर व कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माकपचे तालुका कमिटी सदस्य राजू शिंदे यांनी जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे केली आहे.
-------::-------