कोल्हापूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिरोली येथील श्री सिमंधर कोविड केअर सेंटर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील यांनी मागील वर्षी या सेंटरमधून पाचशे कोरोना रुग्ण उपचार घेऊन गेले आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये व रुग्णांना आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार राजूबाबा आवळे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, फारुख देसाई, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, शिरोली ट्रस्टचे अध्यक्ष शंभुनाथ जयश्री कांबळे, डॉ. निरंजन राठोड, अक्षय बाफना, भरत ओसवाल, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी निलेश चौगुले उपस्थित होते.
--
फोटो नं १००४२०२१-कोल-शिरोली कोवीड सेंटर
ओळ : शिरोली येथील सिमंधर कोविड केअर सेंटर शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी भरत ओसवाल, आमदार राजूबाबा आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
--