सिंगल बातम्या १) नूलमध्ये जखमी कोल्ह्याला जीवनदान
गडहिंग्लज : नूल (ता. गडहिंग्लज) येथे प्राणिमित्रांनी जखमी कोल्ह्याला जीवदान दिले. संदीप मास्तोळी यांना शेतात जखमी अवस्थेतील कोल्हा आढळला. त्याबाबत त्यांनी पशुचिकित्सक डॉ. प्रसाद थोरात यांना सांगितले. डॉ. थोरात यांनी मुसळधार पावसात त्या कोल्ह्याला घरी आणून प्रथमोपचार केले. त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात पुढील उपचार करून कोल्ह्याला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.
---------------------- २) मासेवाडी ग्रामस्थांना दिलासा
गडहिंग्लज : मासेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सुपर स्प्रेडर रॅपिड अॅन्टिजन तपासणी मोहिमेत १०२ जणांची तपासणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. याकामी डी. बी. तानवडे, ए. जी. कोरी, भाग्यश्री खराडे, आर. बी. कांबळे, चाळू घेवडे, अजित होडगे यांनी परिश्रम घेतले.
---------------------- ३) संकेश्वरच्या शिवपुतळ्यासाठी २१ हजाराची देणगी
संकेश्वर : येथील बसस्थानकानजीक उभारण्यात येणाऱ्या अश्वारूढ शिवपुतळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ओतारी यांनी २१ हजाराची देणगी दिली. यावेळी अभिजित कुरुणकर, जयप्रकाश सावंत, डॉ. मंदार हावळ, पी. डी. माने, आप्पा मोरे आदी उपस्थित होते.