१) लाकूरवाडी सरपंचपदी सुजाता राजगोळकर
चंदगड : लाकूरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता नंदकुमार राजगोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच प्रकाश निट्टूरकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. मंडल अधिकारी आप्पासाहेब जिरनाळे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी उपसरपंच सुरेश पवार, आनंदी रेडेकर, अनिता निट्टूरकर, आदी उपस्थित होते.
------------------------ २) दाभिल संघाला विजेतेपद
पेरणोली : दाभिल (ता. आजरा) येथे दहिकालानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत दाभिल संघाने विजेतेपद पटकाविले. तेजमवाडी संघाला उपविजेतेपद, तर देवकांडगाव संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या संघाना अनुक्रमे ४००१, ३००१, २००१, १००१ अशी बक्षिसे देण्यात आली. ------------------------ ३) गडहिंग्लज तालुक्यात रामानुजन जयंती साजरी
गडहिंग्लज : प्रसिद्ध गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी व विद्यार्थ्यांनी गणिती संशोधनाकडे वळावे यासाठी हा दिन साजरा केला जातो.
शहरातील सायन्स सेंटर, सौ. वि. दि. शिंदे हायस्कूल, आर. आर. अॅकॅडमी, तर नूल, बटकणंगले, हलकर्णी, नेसरी येथेही रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
------------------------ ४) चंदगडमध्ये रस्ता कामास प्रारंभ
चंदगड : येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रातील चंद्रसेन वाडा ते जुने बसस्थानकपर्यंतच्या रस्ता कामाचा प्रारंभ झाला. यावेळी दिलीप चंदगडकर, सचिन नेसरीकर, बाबूराव साळुंखे, सदानंद गायकवाड, उदय धाटोंबे, आप्पा भोसले, मुस्ताक गोये, इकबाल मदार, संजय कोपोर्डे, आदी उपस्थित होते.
------------------------ ५) गडहिंग्लजमध्ये साने गुरुजींना अभिवादन
गडहिंग्लज : येथील नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी वाचनालयातर्फे पू. साने गुरुजींचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेविका शशिकला पाटील, नगर अभियंता सुधीर पोतदार, ग्रंथपाल राजेंद्र भुइंबर, आदी उपस्थित होते.