शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अत्याचारप्रकरणी एकास सक्तमजुरी

By admin | Published: February 27, 2015 10:58 PM

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल : अडीच वर्षांपूर्वीचा खटला

कऱ्हाड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मारुती बापू साळुंखे (रा. तामिणे, ता. पाटण) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अडीच वर्षांपूर्वीच्या या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मारुती साळुंखे याच्यावर विक्रोळी-मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ही घटना पाटण तालुक्यामध्ये घडल्याने गुन्हा तपासासाठी ढेबेवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. दरेकर, बी. आर. भरणे यांनी या प्रकरणाचा तपास केला. संबंधित अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी घरामध्ये टीव्ही पाहत बसलेली असताना मारुती साळुंखे याने तिला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने संबंधित मुलीला दिली होती. या प्रकारानंतर मुलीचे आई-वडील मुलीला घेऊन मुंबईला गेले होते. त्याठिकाणी मुलीचा गर्भपात झाला. त्यामुळे अखेर मुलीच्या वडिलांनी याबाबत विक्रोळी-मुंबई पोलिसांत तक्रार दिल्याचे ढेबेवाडी पोलिसांनी केलेल्या तपासांत निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मारुती साळुंखे याला अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ए. वाय. पाटील यांनी काम पाहिले. त्यांचा युक्तिवाद व सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून मारुती साळुंखेला अत्याचार प्रकरणात दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरी, २५ हजार रुपये दंड तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले. डॉ. अजित पवार, डॉ. प्रज्ञा गोरे, डॉ. सविता आवटे यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. युक्तिवाद व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. - अ‍ॅड. ए. वाय. पाटील, सरकारी वकील