गडहिंग्लज : शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त श्रमदान पार पडले. महाविद्यालयाने यापूर्वी चन्नेकुप्पी हद्दीत रोपण केलेल्या वृक्षसंवर्धनासाठीची कामे व परिसराची स्वच्छता केली. यावेळी प्राचार्य मंगलकुमार पाटील, अनिल मगर, नीलेश शेळके, संतोष बाबर, अश्विन गोडघाटे आदी उपस्थित होते.
-------------------------
२) गडहिंग्लजमध्ये बुधवारी सामान्यज्ञान स्पर्धा
गडहिंग्लज : येथील श्री गणेश बालविकास मंचतर्फे बुधवारी (दि. २०) जिल्हास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ९ ते १४ आणि १४ वर्षांपुढील खुला वयोगट अशा दोन गटांत होईल.
------------------------
३) घाळी महाविद्यालयातर्फे ८१ लाखांची शिष्यवृत्ती वाटप
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या १४०८ विद्यार्थ्यांनी ८० लाख ९२ हजारांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय, छत्रपती शाहू शिक्षण शुल्क योजना, एकलव्य, शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता, सीताराम जिंदाल फाउंडेशन बेंगलोर आदी नियमित शिष्यवृत्तींचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती प्राचार्य मंगलकुमार पाटील यांनी दिली.
------------------------
४) गडहिंग्लजमध्ये मिनी बझार उत्साहात
गडहिंग्लज : शहरातील श्री महालक्ष्मी अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांनी भरविलेल्या मिनी बझारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गीता गजगेश्वर यांच्या हस्ते बझारचे उद्घाटन झाले.
बझारमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, काकडी, गाजर, मटार, तिळाचे लाडू व दागिने, चिक्की, गूळ शेंगदाणे, भोपळा, स्पेशल भेळ आदी विविध खाद्यपदार्थांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती. भक्ती येसरे, सुजाता बंबरगेकर, वंदना साबळे, स्नेहा जंगम आदींची उपस्थिती होती.