गडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ४५० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तहसीलदार दिनेश पारगे यांच्याहस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, उपसरपंच सुभाष पोटे, उपसरपंच नंदा गोरूले, मंडल अधिकारी आप्पा कोळी, नगरसेवक राजू धनगर, तलाठी अजयसिंह किल्लेदार आदी उपस्थित होते.
------------------------ २) 'ओंकार'मध्ये नियतकालिकेचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात ओंकार २०२० या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश चव्हाण होते. यावेळी संजीवनी पाटील, भीमराव शिंदे, प्रकाश कांबळे उपस्थित होते. प्रा. ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. बसवराज मगदूम यांनी आभार मानले.
----------------------- ३) स्वयंसेवकांना कोविड लस मोफत द्या
गडहिंग्लज : कोरोना महामारीत गावागावात स्वयंसेवक म्हणून अहोरात्र काम केलेल्या तरुणांनाही कोविडची लस मोफत मिळावी, अशी मागणी विद्यार्थी विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात विठ्ठल कदम, अजिंक्य देसाई, सचिन पुंडे, पांडुरंग पाटील, अमित कांबळे, अविनाश पाटील, अमोल रेडेकर यांचा समावेश आहे.
--------------------- ४) 'शिवराज'मध्ये शनिवारपासून विशेष शिबिर
गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिवराज महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी १० ते १४ एप्रिलदरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांनी दिली. या शिबिरात बोनाफाईड, सेवा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व मार्कलिस्ट आदी दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या ई-मेलवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.