नूल : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) गावचे रहिवासी व सध्या सुक्याचीवाडी (ता. भुदरगड) येथील प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक अनिल वसंतराव कुराडे यांना इचलकरंजी येथील ए. जे. सोशल वेल्फेअर फौंडेशनतर्फे गुणीजन रत्नमोती पुरस्कार जाहीर झाला असून ज्येष्ठ सिनेकलाकार अरुण नलावडे यांच्याहस्ते शुक्रवार (दि. २५) इचलकरंजी येथे पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा अबोली मुल्ला यांनी दिली.
-----------------------------------------------
२) खणदाळमध्ये उपसभापती हसुरी यांचा सत्कार?????
कुणाचा सत्कार केला? बातमीत उल्लेख नाही. पाहावे???
नूल : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे न्यू इंग्लिश स्कूलतर्फे मुख्याध्यापक एकनाथ देसाई व मुख्याध्यापक जयवंत वडर यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी तायगोंडा देसाई, सुनील माने, आप्पासाहेब सुतार, गणपती चोथे, शिवानंद घस्ती, वैभव शहा, सुनील काळे, संजय थोरात आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------
३) नूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेमध्ये गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली. श्रीशैल साखरे यांनी स्वागत केले. रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य जयवंत वडर यांनी केले. प्रा. सुशांत सावंत, चिदानंद हुचगोंड यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक गणपती चोथे यांनी आभार मानले.