नेसरी :
तारेवाडीत (ता. गडहिंग्लज) येथील सार्वजनिक वाचन मंदिरातर्फे आयोजित किल्ला स्पर्धेत २० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेत करण भारती, ऋग्वेद तुपूरवाडकर, हेमंत पाटील, वैभव पाळेकर, संकेत तुपूरवाडकर, यशोधन पाटील, धनराज बोलके, प्रवीण शिंदे, साहिल पाटील, वेदांत पाटील, नीरव भारती यांनी यश मिळविले.
यावेळी प्रशांत तुरटे, विलास भारती, संजय धनके, सुरेश तुरटे, सुरज वाईंगडे, आदी उपस्थित होते.
------------------------
२) अत्याळमध्ये वीज ग्राहकांचा मेळावा
गडहिंग्लज : अत्याळ येथे महावितरणतर्फे वीज ग्राहकांचा मेळावा पार पडला. यावेळी चालू बिले तीन हप्त्यांत, तर कोरोनाकाळातील थकीत बिले भरण्यासाठी बारा हप्ते पाडून देण्यात आले. यावेळी प्र. कार्यकारी अभियंता संजय पोवार, उपकार्यकारी अभियंता एस. एस. दांगट, सहायक अभियंता राजू भोपळे, कनिष्ठ अभियंता दीपक माधव, सहाय्यक लेखापाल दत्तात्रय मयेकर आदी उपस्थित होते.
---------------------
३) सोमनाथ गवस यांचा गौरव
चंदगड : येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गवस यांचा राज्यस्तरीय आदर्श कार्य पुरस्काराने मुंबईच्या मनुष्यबळ विकास सेवा अकादमीतर्फे गौरव करण्यात आला. गवस हे सामाजिक बांधीलकीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत आहेत.
-------------------------
४) नागेंद्र जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. नागेंद्र जाधव यांनी १ जानेवारी २०२१ पासून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सत्याग्रही आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सेवेमध्ये नियमित करून घेण्याचा न्यायालयाचा आदेश असतानाही संस्थाचालकांकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ ते आंदोलन करणार आहेत.
------------------------
-
५) गडहिंग्लजमध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका मूकबधीर असोसिएशनतर्फे शहरातील राम मंदिरात मूकबधीर विद्यार्थ्यांनी राम उपासना सेवाव्रत आणि स्वच्छता अभियान उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी साडेतीन कोटी नामजपाचा संकल्प पूर्ण केला आहे. दर रविवारी मंदिर परिसराची स्वच्छता आणि मंदिरातील विविध कार्यक्रमावेळी सेवा कार्य पार पाडले जाते.
उपक्रमात संदीप सुतार, दीपक शिरगण्णावर, मुबारक ढालाईत, दीपक सावंत, सचिन देवेकर, बाळू माने, राजेंद्र मोरे, किरण कोंडुस्कर, राजू वंजारे यांनी सहभाग घेतला आहे.