गडहिंग्लज : शहरातील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या संकेत तुकाराम जाधव याने राज्यस्तरीय जिनियस २०२१ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. चिंचेवाडी येथील संत गजानन महाराज पॉलिटेक्निकतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. त्याला मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण, जे. एम. भदरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------------
२) गडहिंग्लजमध्ये बापूजी साळुखे यांची जयंती
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक एस. एन. देसाई, एम. एम. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. डी. काशिद, पी. टी. पाटील, व्ही. आर. पालेकर, सी. एस. कुंभार आदी उपस्थित होते.
-----------------------
३) नूल आरोग्य केंद्रात वृक्षारोपण
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. शेटे यांच्या पुढाकाराने व औषधी वनस्पती तज्ज्ञ नागेश चौगुले यांच्या सहकार्याने केंद्राच्या वनस्पतिशास्त्र बगीच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी डॉ. प्रकाश राठोड, बी. एस. व्यवहारे उपस्थित होते.
--------------------------
४) देवरवाडी ग्रामपंचायतीकडून धान्य वितरण
चंदगड : पाटणे फाटा येथील उपेक्षित, वंचित लाडलक्ष्मी, डोंबारी समाजाला देवरवाडी ग्रामपंचायत व प्रिन्स पाइप कंपनीतर्फे ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. या वेळी सरपंच गीतांजली सुतार, नागेंद्र जाधव, विजय भांदुर्गे, पुंडलिक कांबळे आदी उपस्थित होते.
--------------------------
५) विनायक इंदूलकर यांची निवड
गडहिंग्लज : शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या गडहिंग्लज तालुका उपाध्यक्षपदी विनायक इंदूलकर यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. एक वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहे.
------------------------
६) उत्तूर कोविड सेंटरला मदत
उत्तूर : येथील हसन मुश्रीफ फाउंडेशन कोविड केअर सेंटरला पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई व ग्रा. पं. सदस्या समीक्षा देसाई यांनी २१ हजारांची मदत देण्यात आली. या वेळी सुधीर सावंत, वसंतराव धुरे, विठ्ठल उत्तूरकर, काशिनाथ तेली, डॉ. नितीन भाट, पुंडलिक नादवडेकर, संदेश शिवगण, अमित जाधव आदी उपस्थित होते.