गडहिंग्लज :
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गडहिंग्ज तालुका अध्यक्षपदी हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील शंभुराजे शिवाजीराव देसाई यांची निवड करण्यात आली. युवक राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघात देसाई यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. मुंबई प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बबनराव देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांचे ते पुतणे आहेत.
* शंभूराजे देसाई : १७०२२०२१-गड-०१
---------------------------
२) गजानन राशीनकर यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे शास्त्रज्ञ डॉ. गजानन राशीनकर यांच सत्कार करण्यात आला. कर्करोगावरील संशोधनासाठी त्यांना पेटंट मिळाले असून, सध्या ते शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात अध्यापनाचे काम करतात. यावेळी राजेंद्र सावेकर, शिवाजीराव भुकेले, अश्विन गोडघाटे, डॉ. मस्ती, डॉ. मासाळ, किरण पाटील आदी उपस्थित होते.
---------------------------
३) रामचंद्र चव्हाण यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील साधना प्रशालेचे माजी विद्यार्थी रामचंद्र अशोक चव्हाण यांची प्रजासत्ताकदिनी राजपथावरील परेडसाठी निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र निर्देशालयाचा बेस्ट कॅडेट किताप मिळाल्याबद्दल साधना परिवारातर्फे त्यांचा सत्कार झाला.
सध्या ते विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे सिनिअर अंडर ऑफिसर असून ५ महाराष्ट्र बटालियनचे कॅडेट आहेत. साधनाचे प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
याप्रसंगी संस्थेचे संचालक अरविंद बार्देस्कर, पर्यवेक्षक रफिक पटेल, विनय नाईक, संजय घोडके, पी. के. हरेर, बी. एन. वाघमारे आदी उपस्थित होते.