गडहिंग्लज : ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील मातोश्री फौंडेशनतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सुनीता लोहार, माऊली घाटगे, अंकिता देसाई, विहार यादव या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन साहित्य देण्यात आले.
यावेळी निवृत्ती मांगले, पृथ्वीराज देसाई, संजय जाधव, संजय चौगुले, सागर पाटणे, अविनाश सनदी, शुभम पोवार, राहुल शिंदे, आदी उपस्थित होते.
-------------------------
२) ‘ओंकार’मध्ये शहिदांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रांतिकारक शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर होते.
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती दिली. कॉ. उज्वला दळवी यांच्या हस्ते स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयाच्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमास शिवाजीराव होडगे, अनिल उंदरे, आप्पासाहेब कमलाकर, ऊर्मिला कदम, आदी उपस्थित होते.
काशिनाथ तनंगे यांनी स्वागत केले. डॉ. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.