गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील अंध, अपंग, वृद्ध कोविड लसीकरणापासून वंचित आहेत. त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात लस उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना द्यावी, अशी मागणी छ. शाहू महाराज दिव्यांग संघटनेचे कार्याध्यक्ष जोतिबा गोरल यांनी तहसीलदार विनोद रणावरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
--------------------------
२) ‘चंदगड अर्बन’च्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : तुडीये (ता. चंदगड) येथील चंदगड अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकरी संघटनेतर्फे माजी सभापती जगन्नाथ हुलजी यांच्याहस्ते सत्कार झाला. बँक कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही ठेवी, कर्ज वितरण व वसुलीमध्ये भरीव कामगिरी केली आहे. या वेळी शाखा व्यवस्थापक राजाराम सुकये, महेश हुंबरवाडी, हर्षवर्धन कोळसेकर, गणपत पाटील, जक्काप्पा चांदीलकर, सागर नरगुंदकर, कल्लाप्पा गुरव आदी उपस्थित होते.
-----------------------
३) लक्ष्मण लाळगेंचा सत्कार
गडहिंग्लज : मजर्र कार्वे (ता. चंदगड) येथे देवरवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण लाळगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राथमिक शिक्षक समिती व पं. स. स्तरावरील सेवक पतसंस्थेतर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले. या वेळी धनाजी पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, संतू कांबळे, विलास पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------
४) मडिलगेत रोपांचे वितरण
गडहिंग्लज : मडिलगे (ता. आजरा) येथील जाधव कुटुंबीयांकडून आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व भावेश्वरी समूहाचे सदस्य कै. सदाशिव जाधव यांच्या जयंतीनिमित्त गावातील विविध दूध संस्थांमध्ये वृक्षरोपांचे वाटप केले. या वेळी भिकाजी गुरव, दीपक कडगावकर, सुशांत गुरव, प्रकाश कडगावकर, पांडुरंग जाधव, तानाजी येसणे, दीपक देसाई आदी उपस्थित होते.
-----------------------
५) प्राचार्यपदी पाटील यांची नियुक्ती
गडहिंग्लज : कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही. पी. देसाई उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी एस. एन. पाटील (मलतवाडी) यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य वाय. व्ही. कांबळे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते.
-----------------------
६) नेसरी ग्रामपंचायतीला प्रांतांची भेट
गडहिंग्लज : नेसरी येथील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन दक्षता कमिटी व ग्रामपंचायतीला सूचना दिल्या.
नेसरीतील खासगी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व गावातील सर्दी, ताप, खोकला लक्षणे असणाऱ्यांची कोरोना तपासणी करावी, बाधित रुग्णांची कोविड केंद्रात व संस्थात्मक अलगीकरणात रवानगी करावी, अशा सूचना दिल्या.
या वेळी सरपंच आशिषकुमार साखरे, डॉ. नीलेश भारती, मंडल अधिकारी प्राची येसरे, परशराम पाटील आदी उपस्थित होते.