शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

गॅस्ट्रोसदृश साथीबाबत नागरिकांत संभ्रमाची अवस्था

By admin | Published: November 04, 2014 10:31 PM

मुरगूड ग्रामीण रुग्णालयात २०० जणांवर उपचार : परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय?

अनिल पाटील- मुरगूड -मुरगूड शहराच्या आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गॅस्ट्रोसदृश साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण होते, असा दावा वैद्यकीय अधिकारी करत असले, तर मग परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत असून, नागरिकांत मात्र संभ्रमाची अवस्था आहे.परिसरातील सर्वच गावांतून मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांवर योग्य उपचार झाले असून, अद्यापही नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत ठोस पावले उचलावीत व या साथीला लगाम घालावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीपावली सुरू झाल्यापासून सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, हळदवडे, हळदी, करंजिवणे, दौलतवाडी, चिमगाव, अवचितवाडी, आदी गावांतील जुलाब, उलट्या, अशक्तपणा असणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले होते; पण दिवसेंदिवस या प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषत: यमगे, शिंदेवाडी, सुरुपली, हळदवडे या गावांतील रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामध्ये काही रुग्ण खासगी रुग्णालयातही दाखल झाले होते. हळदवडे गावात, तर चिखली आरोग्य विभागामध्ये कणकण अशीच होती. त्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराचे कारण दूषित पाणी हेच होऊ शकते. पैकी सुरुपली या एका गावालाच फक्त वेदगंगा नदीतून पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. शिंदेवाडीमध्ये तर स्वतंत्र फिल्टर व्यवस्था आहे; पण या गावातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेतच. यमगे गावामध्ये लागण झालेल्या काही रुग्णांपैकी काहीजण नळाचे, तर काहीजण कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरतात. हळदवडेतही विहीर व जॅकवेलमधून पाणी पुरविले जाते. मग एकाच वेळी या सर्व गावांतील पाणी कसे प्रदूषित होईल, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. वेदगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाले असेल, तर या नदीकाठावरील अन्य गावांत मात्र अशा प्रकारचे रुग्ण दिसून येत नाहीत. या सर्व गावांमध्ये पिंपळगाव, चिखली व मुरगूड आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. लोकांना लक्षणे व उपचारांविषयी सर्व ती माहिती दिली आहे. तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात याच लक्षणाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे यावरील सर्व गावांतील पिण्याचे पाणी तपासून घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे. बारा वर्षांच्या आठवणी ताज्याबारा वर्षांपूर्वी यमगे गावामध्ये गॅस्ट्रोची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यावेळी १०० ते ४०० जणांना याची लागण झाली होती. त्यामुळे तिघांचा मृत्यूही झाला होता. त्यावेळची परिस्थिती भयावह होती, अशा आठवणी अनेक रुग्णांनी ताज्या केल्या. त्यामुळेच आताच्या या परिस्थितीवर तत्काळ युद्धपातळीवर प्रयत्न करून आळा घालणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.या परिस्थितीत ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून, गार करूनच प्यावे. जास्त थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फराळाचे साहित्य खाण्याचे टाळावे. शक्यतो शेतामध्ये, उन्हामध्ये घरातून नेलेले पाणी पिण्यास वापरावे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, त्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. - डॉ. शामसुंदर सागर,वैद्यकीय अधिकारी, मुरगूड ग्रामीण रुग्णालय