लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील शिवाजीनगर पोलिसांनी पाच संशयित चोरट्यांकडून कार, सहा मोटारसायकली, दोन लॅपटॉप व ३२ मोबाइल असा एकूण सहा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये तिघांना अटक केली असून, दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ही कारवाई शिवाजीनगरच्या नवीन डीबी पथकाने केली.
रामा अशोक कोरवी (वय २३), नागेश हणमंत शिंदे (वय २७, दोघे रा. कोरोची, ता. हातकणंगले), असिफ राजू चिक्कोडे (१९), योगेश बाजीराव कांबळे (२४), अजय भाऊसाहेब पाटील (२५, तिघे रा. कबनूर, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरील सर्व संशयित आरोपी हे उघड्या घरातील मोबाइल चोरी करीत होते. नागेश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याची व रामाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तर असीफ, योगेश व अजय यांना अटक केली आहे.
ही कारवाई डीबी पथकातील सागर चौगुले, गजानन बरगाले, सतीश कुंभार, आशुतोष शिंदे, प्रवीण कांबळे, सुनील बाईक, अमित कांबळे, विजय माळवदे, आदींनी केली.
फोटो ओळी
२३०७२०२१-आयसीएच-०१
शिवाजीनगर पोलिसांनी संशयित पाच चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून कार, सहा मोटारसायकली, दोन लॅपटॉप व ३२ मोबाइल असा एकूण सहा लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.