प्रवीण देसाई -कोल्हापूरया विधानसभेचा २०१४-१५ या वर्षातील कार्यकाळ (एप्रिल ते आॅक्टोबर २०१४) असा सात महिन्यांचा आहे. ३० एप्रिलला झालेल्या शासन निर्णयानुसार सात महिन्यांसाठी आमदारांना एक कोटी १६ लाख ६६ हजार इतका निधी देण्यात आला; परंतु काही आमदारांनी केलेल्या मागणीचा विचार करून दरवर्षी देण्यात येणाऱ्या निधीइतका म्हणजे प्रत्येक आमदाराला दोन कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला. पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती देऊन हा नवीन शासन निर्णय १० जूनला जाहीर करण्यात आला.त्यानुसार जिल्ह्यातील आमदारांना १४ कोटी ७० लाख ५० हजार इतका निधी मिळाला आहे. गतवर्षी दीडपटी वावाच्या मर्यादेत काही आमदारांनी निधी खर्च केला होता. (उदा. दोन कोटींच्या तुलनेत अडीच किंवा तीन कोटींचा निधी खर्च करणे.) त्यामुळे आता मिळालेल्या दोन कोटींमधून पूर्वी खर्च केलेले पैसे वजा करूनच उर्वरित निधी आमदारांना मिळाला आहे. प्राप्त निधीपैकी सर्वांत जास्त निधी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी खर्च केला आहे. त्यांनी एक कोटी २९ लाख १६ हजार रुपयांपैकी एक कोटी दहा लाख नऊ हजार रुपये विविध विकासकामांवर खर्च केले आहेत. शिरोळचे आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी एक कोटी दहा लाखांपैकी ७८ लाख ७९ हजार रुपये निधी खर्च केला आहे. कागलचे आमदार तथा जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक कोटी ११ लाख २९ हजारांपैकी ७४ लाख ९० हजार रुपये, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी एक कोटी २० लाख ९७ हजारांपैकी ६८ लाख १८ हजार रुपये, कोल्हापूर दक्षिणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक कोटी २६ लाख ४२ हजार रुपयांपैकी ६६ लाख २० हजार रुपये, हातकणंगलेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी एक कोटी १४ लाख ८५ हजारांपैकी ५१ लाख १८ हजार ७६४ रुपये, इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी एक कोटी १४ लाख ८५ हजारांपैकी ४९ लाख ३० हजार ८९६ रुपये, राधानगरीचे आमदार के. पी. पाटील यांनी एक कोटी ३३ लाख ८९ हजारांपैकी ४४ लाख ४० हजार रुपये, शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी ३१ लाख ३५ हजार रुपये, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चार लाख ९९ हजार रुपये निधी खर्च केला आहे.जिल्ह्यातील बारा आमदारांनी मिळालेल्या निधीपैकी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी एक कोटी दहा लाख नऊ हजार रुपये, तर सर्वांत कमी चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चार लाख ९९ हजार रुपये खर्च केले आहेत.-आमदारांच्या मागणीनुसार सात महिन्यांच्या कालावधीसाठी दोन कोटींचा निधी-हा नवीन शासन निर्णय १० जूनला जाहीर करण्यात आला.-दीडपटी वावाच्या मर्यादेतील निधी वगळून मिळाला एकूण १४ कोटी ७० लाख ५० हजार इतका निधी.
सहा कोटी आमदार निधी मागी
By admin | Published: July 24, 2014 12:17 AM