कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारुप यादीवर सोमवारी सहा हरकती दाखल झाल्या. आतापर्यंत १३ हरकती आल्या असून १३ सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे.
जिल्हा बँकेची प्रारुप यादी प्रसिद्ध केल्यानंतर ३ सप्टेंबरपासून हरकती दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी सात हरकती विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे दाखल झाल्या. सोमवारी सहा आल्या आहे. आतापर्यंत आलेल्या तेरा हरकतींपैकी नऊ मयत असल्याने संस्था प्रतिनिधीचे नाव बदलणे, दोन यादीत नाव नसल्याबाबत तर दोन प्रतिनिधींच्या नावावर हरकती आल्या आहेत.
आतापर्यंत गटनिहाय अशा हरकती आल्या आहेत. गट क्रमांक १ (विकास संस्था) : ८, गट क्रमांक २ (प्रक्रिया संस्था) : १, गट क्रमांक ३ (बँक, पतसंस्था) : २, गट क्रमांक ४ (इतर संस्था) : २.