शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

लूटमार करणाऱ्या सहाजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:33 AM

कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाºया जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

कोल्हापूर : दिवसा सेंट्रिंग काम आणि रात्री लूटमार करणाºया जिल्ह्यातील सहाजणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या ताब्यातून कार, दुचाकी, ४५ मोबाईल हॅँडसेट, आठ तलवारी, रोख रक्कम असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.टोळीतील आणखी दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.संशयित म्होरक्या आशिष हणमंत गायकवाड (वय २३), राज अंजुम मुल्ला (१९), शंकर सुनील गायकवाड (१९, तिघे रा. राजेंद्रनगर), प्रकाश शांताराम कोकाटे (१९, मोतीनगर, कोल्हापूर), तुषार रवींद्र लोहार (२०, रा. चोकाक, ता. हातकणंगले), सुभाष विष्णू पाटील (२७, रा. अतिग्रे, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.या सर्वांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. त्यांचे आणखी दोन साथीदार पसार आहेत. शिरोली एम. आय. डी. सी. येथे २६ आॅक्टोबरला कारखान्यातून घरी जाणारा परप्रांतीय कामगार राजेशकुमार पाल याला सहाजणांच्या टोळीने रात्री साडेनऊच्या सुमारास रस्त्यात अडवून, तलवारीचा धाक दाखवून मोबाईल, चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला होता. हा गुन्हा राजारामपुरी येथील एका सक्रिय टोळीने केल्याची माहिती हवालदार संतोष माने यांना मिळाली होती.ही टोळी कार (एमएच ०९ एस - ९५२२) मधून राजाराम तलाव परिसरात येणार असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली. त्यानुसार पथके रवाना करून सापळा लावला असता राजाराम तलावाकडे जाणाºया रस्त्याच्या भूचुंबकत्व संस्थेसमोर कारमधून आलेल्या सहाजणांना पकडले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये आठ तलवारी, कापडात बांधलेले मोबाईल हॅँडसेटचे गाठोडे, पाकीट आढळून आले. पाच हजार ते चाळीस हजार किमतीचे मोबाईल गाठोड्यात दिसून आले.कामगार पाल यांचे आधारकार्डही आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या टोळीचे म्होरके आशिष गायकवाड आणि प्रकाश कोकाटे असल्याचे निष्पन्न झाले. दिवसभर सेंट्रिंग काम करायचे; त्यानंतर चोरून आणलेल्या कारमधून ते गोकुळ शिरगाव, शिरोली एम. आय. डी. सी. इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ परिसरातील परप्रांतीय कामगारांना तलवारीचा धाक दाखवून लूटमार करीत असत. आतापर्यंत त्यांची चार गुन्ह्णांची कबुली दिली आहे. सर्वजण आठवीपर्यंत शाळा शिकले आहेत. आई-वडील मोजमजुरी करतात. चैनी, मौजमजा आणि झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी ते सेंट्रिंग कामानंतर रात्री लूटमार करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अंगाला हात लावायचा नाय!संशयित प्रकाश कोकाटे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करते. हा टोळीचा म्होरक्या असल्याने पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो ‘अंगाला हात लावायचा नाय...!’ अशी पोलिसांनाच दमदाटी करू लागला. शरीराने सडपातळ असलेल्या या म्होरक्याला अजून मिसरूडही फुटलेली नाही. त्याच्या अंगातील गुन्हेगारीचा माज पोलिसांनी खाकी प्रसादाने उतरविला.