भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सहा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना पहिल्या टप्प्यात ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने शाळांना मानांकन मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे. त्यामुळे शासकीय शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असा प्राथमिक शिक्षण प्रशासनाचा दावा आहे.व्हन्नूर, गलगले, केनवडे, अर्जुनवाडा, फराकटेवाडी, सोनाळी या गावांतील विद्यामंदिर शाळांना हे मानांकन मिळाले आहे. जानेवारी आणि या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळांचे मूल्यमापन खासगी संस्थेतर्फे विविध ४३ निकषांवर करण्यात आली. त्यामध्ये या शाळा पात्र ठरल्याने ‘आयएसओ ९००१२००८’ मानांकन जाहीर केले आहे. इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या घटते आहे. काही शाळांत हाताच्या बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी आहेत. परिणामी, प्रत्येक वर्षी शिक्षक अतिरिक्त होत आहे. सामान्य, गरिबांसाठीच्या या शासकीय शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण प्रशासन नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. आपल्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. गुणवत्ता वाढावी याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. भौतिक सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत.खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी सर्व दृष्टीने पात्रता सिद्ध करण्यासाठी जिल्ह्णातील ६८ प्राथमिक शाळा ‘आयएसओ’च्या स्पर्धेत उतरल्या आहेत. या संबंधित शाळांची केंद्र सरकार पुरस्कृत ‘व्हिमजीट’ कंपनीकडून जुने रेकॉर्ड कसे ठेवले आहे, गुणवत्ता, सौरऊर्जा व गांडूळ खत प्रकल्प, ई-लर्निंग, विद्यार्थ्यांना वर्गात दिल्या जाणाऱ्या सेवा,भौतिक सुविधा अशा ४३ निकषांवर तपासणी केली जात आहे. सर्व निकष पूर्ण केलेल्या कागल तालुक्यातील या सहा शाळांना ही कंपनी ‘आयएसओ ९००१२००८’ हे प्रमाणपत्र दिली आहे. सेवा, गुणवत्ता, सुविधा यांच्यात सातत्य आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मानांकनप्राप्त शाळांची सलग तीन वर्षे तपासणी केली जाणार आहे.पुढाकारामुळे यश‘आयएसओ’ मानांकनासाठी पहिल्यापासून कागल तालुक्याने चांगला पुढाकार घेतला. निकष पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणीतून भौतिक सुविधा उभारल्या. त्यामुळे सहा शाळा आयएसओ मानांकित होण्याचा जिल्ह्यात पहिला मान कागल तालुक्याला मिळाला. व्यापक पुढाकारामुळे हे यश मिळाले आहे.जिल्ह्यातील ६८ प्राथमिक शाळा ‘आयएसओ मानांकन’ करण्याचे उद्दिष्ट आहे. नुकत्याच झालेल्या तपासणीत कागल तालुक्यातील सहा शाळा आयएसओ मानांकित झाल्याचे जाहीर झाले. अधिकाधिक शाळांना मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील सहा प्राथमिक शाळांना ‘आयएसओ’
By admin | Published: February 12, 2016 1:16 AM