शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

९३व्या वर्षीही पायाडावर उभे राहून शिल्पांना आकार; राम सुतार यांचे मोठेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:48 PM

कोल्हापूर : त्यांचे वय अवघे ९३ वर्षे; पण अजूनही त्यांचे हात सुरेख शिल्प साकारण्यात गुंतलेले. लहानपण हलाखीत गेले असले, ...

कोल्हापूर : त्यांचे वय अवघे ९३ वर्षे; पण अजूनही त्यांचे हात सुरेख शिल्प साकारण्यात गुंतलेले. लहानपण हलाखीत गेले असले, तरी हातात सरस्वतीचा वास होता. त्यांनी साकारलेले पुतळे देशातच नव्हे, तर जगभरात मोठ्या मानसन्मानाने बसविले गेले. नुकताच गुजरातमधील सरदार सरोवर येथे साकारण्यात आलेला ५५0 फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बिंदू. हे तरुण शिल्पकार म्हणजे राम सुतार. या मराठमोळ्या कलाकाराला गुुरुवारी ‘टागोर सांस्कृतिक ऐक्य पुरस्कार’ जाहीर झाला.शिल्पकलेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नोएडामध्येही त्यांचा स्टुडिओ आहे. या वयातही ते पायाडावर उभे राहून शिल्प साकारतात. त्यांच्या शिल्पकलेचा वारसा मुलगा अनिल, नातू समीर व नात सोनाली हे चालवित आहेत.मूळचे धुळ्याचे असलेले शिल्पकार राम सुतार यांचे वडील वनजी लाकडी वस्तू व कृषी अवजारे बनवायचे. राम यांना वडिलांकडूनच कलाकुसरीच्या वस्तू साकारण्याचे कौशल्य मिळाले. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची गुरूश्रीरामकृष्ण जोशी यांच्याशी भेट झाली. राम सुतार यांनी १९४७ साली बॉडी बिल्डरचा पहिला पुतळा बनवला. आपल्याच शाळेसाठी १९४८ साली महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला. तेथून त्यांचा शिल्पकलेचा प्रवास सुरू झाला. जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचविले, शिवाय त्यांची राहण्याची व उदरनिर्वाहाची सोयही करून दिली. त्यांनी सुवर्णपदकही मिळविले.महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारने रशिया, मलेशिया, इंग्लंड अशा विविध देशांना महात्मा गांधीजींचा पुतळा भेट दिला. गांधीजींचे भारतासह जगभरात बसविलेले जवळपास ३५० पुतळे राम सुतार यांनी साकारले आहेत. दिल्ली विमानतळावर बसविण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, तसेच सरदार वल्लभभार्इंचा सरदार सरोवर येथे साकारण्यात येणारा ८५ फूट बेस व ५२२ फूट उंचीचा सर्वांत मोठा पुतळा बनविण्याचे काम सुतार यांच्याकडेच आहे. अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही त्यांच्याकडेच आहे.संसद परिसरात १६ पुतळेराम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतकी आवडली की, त्यांना भाक्रा नानगल धरणावर ब्राँझचा पुतळा बनवण्यास सांगितले; मात्र काही कारणामुळे हा प्रकल्प अपूर्ण राहिला. त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारात बसविण्यात आलेले शिवाजी महाराज, महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, महात्मा फुले, अशा थोर विभूतींचे जवळपास १६ पुतळे बनवले.