शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शिराळा पश्चिममध्ये झाडांची कत्तल

By admin | Published: May 16, 2015 12:01 AM

ठेकेदार मालामाल : ‘इको व्हिलेज’साठी कोट्यवधींचा खर्च; दुसरीकडे झाडांवर कुऱ्हाड

गंगाराम पाटील - वारणावती -शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, सोनवडे, मणदूर, करुंगली, पणुंब्रे, चरण, किनरेवाडी, चिंचेवाडीसह अन्य गावातील डोंगर, पठार व शिवारातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. वन खाते ठराविक झाडे तोडण्यासाठी परवानगी देते, पण तोडीची परवानगी घेणारे मात्र परवान्याच्या जोरावर मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करीत आहेत.शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे आणि दुसरीकडे झाडांची कत्तल सुरू आहे. शेवरीच्या झाडांचा उपयोग सेंट्रिंग व पॅकिंगच्या बॉक्ससाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ती झाडे तोडली जात असल्याने या भागातून शेवरीची झाडे नामशेष होत आहेत. हे थांबवण्याची मागणी लोकांतून व निसर्गप्रेमींमधून होत आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील आरळा, सोनवडे, मणदूर, चरण आदींसह अन्य गावातील डोंगर, पठार व शिवारातील झाडांची कत्तल सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात ठेकेदार झाडे खरेदी करतात. त्याची सात-बाराला नोंद असेल व ते झाड धोकादायक असेल तर फॉरेस्ट खाते अशा झाडांच्या तोडीस परवानगी देते. पण ठेकेदार व फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून कोणत्याही झाडांना परवानगी घेतात. ठराविक झाडांना परवानगी घ्यायची आणि परवानगीच्या नावाखाली राजरोसपणे इतर झाडांची कत्तल करायची, असे प्रकार या परिसरात सुरू आहेत. यातून झाडे तोडणारे ठेकेदार व सॉ-मिलवाले लाखो रुपये कमवून मालामाल होत आहेत. या भागातील गरीब शेतकरी गरजेपोटी बांधावरील झाड विकून आपली गरज भागवतात; पण त्यांनाच जर घर बांधणीसाठी लाकूड लागले, तर मात्र झाडे तोडणारे ठेकेदार अशा शेतकऱ्यांना चढ्या दराने लाकूड देतात. चांदोली धरणाच्या पाटबंधारे खात्याच्या वसाहतीच्या व कार्यालयाच्या परिसरातील निलगिरी, शिसव व अन्य झाडे तोडण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी परवानगी देत आहेत. शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, तर मलिदा मिळविण्यासाठी शासनाचे अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देत आहेत. झाडे तोडल्यामुळे निसर्गाचा हिरवागर्द खजिना नामशेष केल्याने वारणावती वसाहत पार उजाड झालेली आहे.वृक्षतोड होत असल्याने त्याचा हवामानावर परिणाम होत आहे. शिवाय एकीकडे शासन वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च करुन इको व्हिलेज योजना राबवत आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू आहे. वृक्षतोडीस परवानगी देणाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घालावेत व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.अधिकारीच देतात परवानगीराज्य शासन एकीकडे इको व्हिलेजची घोषणा करून झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, तर दुसरीकडे मलिदा मिळविण्यासाठी चांदोली धरणाच्या पाटबंधारे खात्याचे अधिकारी झाडे तोडण्याची परवानगी देऊन निसर्गाचा ऱ्हास करू लागले आहेत. त्याबाबत ग्रामस्थ, पर्यटकांतून संताप व्यक्त होत आहे.