शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

शैक्षणिक व्यासपिठचे ‘झोपमोड आंदोलन’

By admin | Published: November 15, 2015 1:02 AM

चंद्रकांतदादा पाटील : मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ

कोल्हापूर : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री येथे दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाजवळ ‘झोपमोड आंदोलन’ केले. तत्पूर्वी, खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी व शिरोलीतील आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले. यावेळी पाटील यांनी शिष्टमंडळाला मिठाई दिली. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध प्रकारच्या आंदोलनांचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर नाळे कॉलनीतील निवासस्थानी शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी हे आश्वासन दिले. या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून ३० नोव्हेंबरला समितीच्या वतीने पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २८ आॅगस्ट २०१५ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा अहवाल त्वरित मान्य करावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम करावी, प्राथमिक शाळांमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत, शिक्षक व शिक्षकेतरांना शालाबाह्ण कामे न देणे, अनुदानास पात्र शाळा / कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळावे, आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले होते. शिष्टमंडळात सभाध्यक्ष एस. डी. लाड, डी. जी. लाड, व. ज. देशमुख, आर. वाय. पाटील, प्रा. एस. बी. उमाटे, उदय पाटील, आर. डी. पाटील, शिवाजी कोरवी, बी. जी. बोराडे, आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)