शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गाळप हंगामाला वेग, सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:04 PM

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे.

ठळक मुद्देविभागात सात दिवसांत दोन लाख ४५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप सरासरी साखर उतारा ७.३५ टक्क्यांवर

कोल्हापूर : राज्यातील सत्तारोहणाच्या घडामोडींत व्यस्त असतानाही गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नाही. ऊस परिषदेनंतर अधिकृतपणे सुरू झालेल्या गाळपानुसार गेल्या सात दिवसांत कोल्हापूर विभागातील १० कारखान्यांनी दोन लाख ४५ हजार २१२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ७.३५ टक्के आहे. दरम्यान, हंगाम वेग घेत असताना अजूनही विभागातील सात कारखान्यांचे भवितव्य अधांतरीच आहे. त्यात वारणा कारखान्याचा अपवाद वगळता उर्वरित सहा कारखान्यांच्या सुरू होण्यावरच अनिश्चिततेचे सावट आहे.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांनी गव्हाणीत मोळ्या टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला; पण ऊस परिषदेच्या धास्तीमुळे गाळपाला दबकतच सुरुवात केली होती. परिषदेत आंदोलनाची भूमिका ठरलेली नसल्याचा फायदा उचलत २२ पासूनच अधिकृतपणे गळितास सुरुवात झाली आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात आजच्या घडीला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापुरातील १९ व सांगलीतील १२ असे ३१ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. कोल्हापुरातील जवाहर व सांगलीतील सर्वोदय व विश्वास हे दोन कारखाने १ डिसेंबरला सुरू होत आहेत.

कोल्हापुरातील वारणा आणि आजरा या दोन कारखान्यांनी अजूनही गाळपासाठी परवाना मागणी केलेली नाही. त्यांपैकी वारणा कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी चालविली आहे; पण आजरा कारखान्याच्या पातळीवर सामसूम दिसत आहे. हंगाम सुरू होईल की नाही, याबाबतच आता साशंकता व्यक्त होत आहे. सांगलीतील माणगंगा कारखान्याने हंगाम सुरूच करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महांकाली, तासगाव, डफळे- जत, यशवंत- खानापूर हे कारखाने चालू करण्याबाबत अनिश्चितता दिसत आहे.आता प्रतीक्षा बैठकीचीआता हंगामाने वेग घेतला असला तरी पहिली उचल किती मिळणार हे अजून ठरलेले नाही. एफआरपी अधिक २०० रुपये अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ऊस परिषदेनंतर साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक होणार होती; पण राज्यातील सत्तास्थापनेत सर्वचजण गुंतल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक कधी होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.उता-यात ‘खासगी’ सरसकोल्हापूर विभागात गेल्या सात दिवसांत झालेल्या गाळपातून एक लाख ८० हजार २७० मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उतारा मात्र केवळ ७.३५ टक्के आहे. त्यातही खासगी कारखाने सरस ठरले आहेत. त्यांचा उतारा ७.३७ टक्के, तर सहकारी कारखान्यांचा ७.३४ टक्के आहे. विभागात राजाराम सहकारी कारखान्याचा १.३३ टक्के इतका सर्वांत कमी उतारा आहे; तर सांगलीच्या ‘उदगिरी शुगर’ या खासगी कारखान्याचा ९.४४ टक्के इतका सर्वोच्च उतारा नोंदविला गेला आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर