शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

‘स्मार्ट’कार्डचा घोळ

By admin | Published: August 14, 2015 11:41 PM

‘आरटीओ’चा कारभार : वाहनधारकांचे चार लाख पडून

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांकडून गेल्या वर्षी स्मार्ट कार्डापोटी घेतलेले ४ लाख ९ हजार ८५० रुपये अद्यापही कार्यालयाकडेच पडून आहेत. विशेष म्हणजे एक वर्ष होऊनही स्मार्ट कार्डही मिळेना आणि पैसेही परत मिळेनात. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक कार्यालयांकडून वाहनधारकांना नवीन वाहनाची नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे स्मार्ट कार्ड २६ नोव्हेंबर २०१४ पासून देणे अचानक बंद केले आहे. त्यावेळी ज्या कंपनीकडे स्मार्ट कार्ड बनवून देण्याचा ठेका देण्यात आला होता, त्यांनी आपली कामाची मुदत संपल्याचे कारण देत लाखो वाहनधारकांचे स्मार्ट कार्ड देण्यास नकार दिला. वाहनधारकांनी प्रत्येकी ३९४ रुपये भरले होते. त्यात ४० रुपये केवळ परिवहन कार्यालयास मिळणार होते, तर ३५० रुपये स्मार्ट कार्डसाठी वर्ग करण्यात येत होते. त्यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांसह कोल्हापुरातील ११७१ वाहनधारकांचेही ४ लाख ९ हजार ८५० रुपये अडकले. याबाबत वाहनधारकांनी आपल्याला वाहन नोंदणीचे स्मार्ट कार्ड त्वरित द्यावे, म्हणून कार्यालयाकडे विनंती अर्जही केले. मात्र, कार्यालयाकडून नेहमीप्रमाणेच ‘ही बाब आमच्या अखत्यारित नसून, परिवहन आयुक्त कार्यालयातून याबाबतचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे नोंदणी कार्ड हवे असल्यास ते प्रिंट करून कागदावर मिळेल,’ असे उत्तर दिले जाते. वाहनधारकांत संभ्रमावस्थास्मार्ट कार्ड देणे बंद केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नूतन नोंदणीधारकांना आरसी व टीसी बुकची प्रिंट दिली. पैसे भरून घेताना मात्र या स्मार्टकार्डसहीत पैसे भरून घेतले. याबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. ज्या वितरकाकडून ग्राहकांनी गाड्या खरेदी केल्या, तेही मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे आपण भरलेले पैसे मिळणार की नाही, अशा संभ्रमावस्थेत हे वाहनधारक आहेत. आम्ही स्मार्ट कार्ड बनविणाऱ्या रोझमॉल्टा या कंपनीशी संपर्क ठेवून आहोत. यामध्ये एक तर ही स्मार्ट कार्डे कंपनीने आम्हाला बनवून द्यावीत; अन्यथा पैसे परत करावेत, अशी लेखी मागणी या कंपनीकडे केली आहे. याबाबत परिवहन आयुक्तालय निर्णय घेणार आहे. तरी ज्यांनी असे पैसे भरले असतील त्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज करावेत. - राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी